ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खडकपूर्णा जलाशयामध्ये पाच बोटी पकडून जिलेटिनच्या साहाय्याने उडविल्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 जिल्हाधिकारी किरण पाटील यांचे मार्गदर्शना खाली 6 मार्च रोजी अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, परिवहन विभाग, खडकपूर्ना प्रकल्प विभाग यांनी संयुक्त पणे जिल्हा स्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने शोध मोहीम हाती घेतली. संपूर्ण दिवसभर ही कार्यवाही सुरू होती . ,काही बोटी मराठवाडा शिवारात जाफराबाद कडे पळून गेल्या. शेवटी मौजे चिंचखेड शिवारात अवैध रेती उपसा करणाऱ्या तीन फायबर बोटी व दोन इंजिन बोटी अशा एकूण पाच बोटी पकडण्यात आल्या . त्यांना किनाऱ्यावर आणून स्फोटके लावून उडविण्यात येऊन नष्ट करण्यात आले. सदर बोटी किनाऱ्यावर लावणे व त्यानंतर जिलेटिन च्या साहाय्याने उदविण्यासाठी बराच त्रास घ्यावा लागला बराच अडचणीचा सामना करावा लागला, त्या अडचणीवर मात करत शेवटी बोटी उडविण्यात यश आले

ही कार्यवाई उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचे मार्गदर्शन तथा उपस्थितीत पार पडली. यावेळी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ मॅडम, नायब तहसीलदार संतोष मुंडे साहेब, ना तहसीलदार सायली जाधव मॅडम, मंडळ अधिकारी विजय हिरवे, प्रल्हाद केदार, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, सागर देशपांडे, सुमित जाधव, संजय बरांडे, तेजस शेटे महसूल सेवक काकडे व हरने ई सर्व महसूल विभाग अधिकारी /कर्मचारी महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल शिंदे मॅडम व इतर पोलीस कर्मचारी, परिवहन विभागाचे अधिकारी परिवहन निरीक्षक प्रतीक रोडे साहेब व सहकारी, खडकपुर्णा प्रकल्प उपविभाग चे अधिकारी एस जे तल्हार व सहकारी ,शोध व बचाव पथक मोहीम चे पवार साहेब व त्यांचे सहकारी हजर होते.ही कार्यवाही रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये