Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दहा फूट अजगराला युवकांनी दिले जीवदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

          तालुक्यातील वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बरांज तांडा येथील धमाबाई निवासी आश्रम शाळेजवळ तेथील विद्यार्थ्यांना १० फूट लांबीचा अजगर दिसून आला.याची माहिती आश्रम शाळेतील अधिक्षांना दिली असता त्यांनी सर्पमित्रांना बोलाऊन अजगराला पकडले.

सदर अजगराची नोंद वनविभागाच्या भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयात करून त्यास आयुध निर्मानीच्या जंगल परिसरातील हनुमान मंदिराजवळ सोडून जीवदान दिले.ही कारवाई सर्पमित्र आशिष चहाकाटे,राहुल खोडे,शैलेश पारेकर व दिलीप शेडमाके यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये