जिवतीत विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध जयंती
विहारात सकाळपासूनच बुद्ध, भीम गीतांचे निनादत होते सूर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- येथील पंचशील बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा तर्फे आयोजित महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची २,५८८ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रीशरण पंचशीला घेण्यात आली.
शहराध्यक्ष व्यंकटी कांबळे, शहर उपाध्यक्ष नभिलास भगत, शहर सरचिटणीस शरद वाटोरे आदींनी बुद्धांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. यावेळी वैशाली वाटोरे, सुजाता भगत, जयमाला कांबळे, विशाखा भगत, अर्चना कांबळे, सचिव दिलीप जीवने, संघटक गिरीश कांबळे, तालुका सरचिटणीस चंदू रोकडे, तालुकाध्यक्ष दिपक साबने, बळीराम काळे, अमोल कांबळे, प्रदीप काळे, संकेत भगत, प्रशांत कांबळे व जिवती तालुका व शहर शाखेचे पदाधिकारी यांचेसह मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव, भगिनी यांची उपस्थिती होती.
तसेच तालुक्यातील विविध गावात भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक संघटनातर्फे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. येल्लापूर, पुनागुडा, शेणगाव, बुद्धगुडा, माराई पाटण, मुकदमगुडा, परमडोली आदी गावातील बुद्ध विहारात सकाळी व सायंकाळी बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी बौद्ध अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून विहारात आले होते. सकाळपासूनच विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध गीतांचे सूर निनादत होते. वंदना झाल्यानंतर काही गावात खीर, प्रसादाचे वाटप करण्यात आले.
– व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी समाज माध्यमांवरही तथागत गौतम बुद्धांचे विचार, तत्वज्ञान, छायाचित्र, संदेश पाठवून त्यांना स्मरण करण्यात आले. तसेच समाज माध्यमांवर जयंतीच्या शुभेच्छांचा वर्षाव दिसून आला