Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप

पुरुष गटात जबलपूर, तर महिला गटात जानेफळ ठरले विजेता

चांदा ब्लास्ट

जयहिंद क्रिडा मंडळ वरोरा च्या वतीने स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दि. 10, 11 व 12 जानेवारी रोजी खासदार चषक 2025 अखिल भारतीय खुले कबड्डी सामन्यांचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर करण्यात आले होते.

तीर दिवस चाललेल्या या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव मोघे, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.

सदर स्पर्धेकरीता देशभरातून विविध राज्यातून क्रिडा मंडळांनी सहभाग नोंदविला. यामध्ये काही प्रो-कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंचा देखील सहभाग होता. रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत पुरुष गटात स्टार अकॅडमी जबलपूर या संघास प्रथम पारितोषिक तर, राजपूत स्पोर्ट जानेफळ हा संघ द्वितिय पारितोषिकाचे मानकरी ठरला. सरकार ग्रूप व एन.जी. अकॅडमी सोनीपत हे संघ तृतीय पारितोषीकाचे मानकरी ठरले. महिला गटात राजपूत स्पोर्ट जानेफळ या संघास प्रथम पारितोषीक तर, आर.टी.एम. नागपूर हा उपविजेता ठरला. तर, सेवालाल क्रिडा मंडळ देवठाण व साई क्रिडा मंडळ काटोल हे तृतीय पारितोषीकाचे मानकरी ठरले.

पुरुष गटात उत्कृष्ठ खेळाडू म्हणून दुर्गेश नैताम जबलपूर या खेळाडूस बुलेट गाडी देऊन गौरवण्यात आले. तर महिला गटात उत्कृष्ठ खेळाडू म्हणून ई-स्कुटी गाडी देऊन गौरवण्यात आले. या व्यतिरिक्त हजारो रुपयांचे वैयक्तिक पारितोषीके खेळाडूंना देण्यात आले. सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन जय हिंद क्रिडा मंडळाचे अध्यक्ष प्रविण काकडे, सचिव कासिफ खान व मंडळाचे असंख्य पदाधिकारी यांच्या सांघिक प्रयत्नाने करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये