ताज्या घडामोडी

कोरपना येथून या मार्गावर बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी

प्रवाश्यांना अडचण ; राज्य परिवहन महामंडळाने द्यावे लक्ष

चांदा ब्लास्ट :

 

कोरपना – तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथून थेट जाणारे प्रवाशी उपलब्ध असताना ही अनेक ठिकाणी जाण्या येण्यासाठी बस फेऱ्या नाही. त्यामुळे प्रवश्यांची गैरसोय होते आहे. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाने लक्ष देऊन या शहरासाठी थेट बस फेऱ्या सुरू कराव्या अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोरपना येथून सद्यस्थितीत अमरावती , चंद्रपूर , आदिलाबाद , उटनुर , किनवट,बेला, वणी , राजुरा , मुकुटबन, गडचांदूर, मांगलहिरा , पारडी, परसोडा, कोडशी आदी ठिकाणी जाण्या येण्यासाठी बस सेवा आहे. यातील अमरावती जाणारी सकाळी सव्वा आठ ची बस फक्त जाण्यासाठी आहे. परत ती वणी पर्यंतच आहे. सकाळी एक जाणारी बस ही येल्लापुर साठी आहे. मात्र ती परत येत नाही. ती राजुरा जाते. वरोरा – आदिलाबाद ही बस चंद्रपूर – घुघुस मार्गे जाते. मात्र राज्याची उपराजधानी व विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपूर साठी एक ही थेट बस सेवा नाही. राजुरा व वणी या दोन्ही मार्गे प्रत्येकी तीन बसेस तीन वेळेत सोडण्यात यावी अशी अनेक दिवसापासून प्रवश्याची मागणी आहे. परंतु एक ही बस जानेवारी २०२० पासून चालू नाही. वरोरा वरून वणी मार्गे थेट बस सेवा सुरू कराव्या. जेणेकरून वणी मार्गे असणाऱ्या अत्यल्प बस फेऱ्याच्या माध्यमातून होणारी गैरसोय दूर होईल. तसेच गडचांदुर – वरोरा बस कोरपना पर्यंत वाढविण्यात याव्या. घुग्घुस ( चारगाव मार्गे ) , पांढरकवढा, घाटंजी, निर्मल, हैदराबाद, नांदेड , लातूर , उदगिर ( आदिलाबाद मार्गे ) , जिवती , भारी ( धनकदेवी मार्गे ) , यवतमाळ ( वणी मार्गे ), गडचिरोली , अहेरी , गोंडपिपरी, चिमूर , आसिफाबाद , वर्धा , उमरेड , सावनेर ,भद्रावती , भडारा, ब्रम्हपुरी ,
चंद्रपूर ( भोयगाव मार्गे ) , कवठाळा , नांदाफाटा , येरगव्हाण, सावलहिरा आदी गाव व शहरासाठी बस सेवा सुरू होणे प्रवाशी दृष्ट्या आवश्यक आहे. जेणेकरून होणारी अडचण दूर होईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये