ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खामगाव जालना रेल्वे मार्गाचे भूमिपूजन त्वरित करा

महाविकास आघाडी देऊळगाव राजा ची मागणी ; तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

खामगाव ते जालना रेल्वे मार्गाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहेत,तेव्हा रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरु करावे या प्रमुख मागणी सह इतर मागण्या मान्य करण्यासाठी चिखली येथे तहसील कार्यालयासमोर 22 जानेवारी पासून रेल्वे लोक आंदोलन समिती बुलडाणा जिल्हा च्या वतीने सत्याग्रह व साखळी उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनाला देऊळगाव राजा येथील महाविकास आघाडी ने पाठिंबा देऊन निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे,निवेदनात लोक आंदोलन समिती ने केलेल्या मागण्या मध्ये रेल्वे बोर्डाने खामगाव जालना मार्गासाठी 50 टक्के निधी मंजूर करून पाठवावा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट 2014 रोजी रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे,या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मान्यता तात्काळ मिळवावी,जमीन संपादन करण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू करावी.

या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खामगाव येथे करावे,5 वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण करावा,या मागण्याचा समावेश आहे, निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष विष्णु झोरे,शिवसेनेचे शहर प्रमुख गोविंदराव झोरे,नगरसेवक हनिफ शाह,प्रभाकर खांडेभराड,अमोल दंदाले,श्याम वनकर, अमोल जाधव, अशोक माळोदे,श्रीराम पुगळे, वसंतअप्पा खुळे, विठ्ठलराव खांडेभराड,नितेश देशमुख,गणेश आडे,मुशीर खान कोटकर, प्रा अशोक डोईफोडे,जाकीर खान मोहसीन खान,आप्पासाहेब राजे,गणेश सवडे, ऍड राजू मांटे,ज्ञानेश्वर शेळके,दिनकर खरात,राजू नागरे,बंडू राजे डोळस,हरिभाऊ वाघ,व इतर महाविकास आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये