ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण

तिघाविरोधात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आळंद येथील विठोबा गमाजी खार्डे यांना त्याच्या घरासमोर शिवाजी रंगनाथ खार्डे याने विनाकारण शिवीगाळ केली तेव्हा मुलगा समाधान हा त्यास समजविण्यासाठी आला असता पूजा शिवाजी खार्डे व अनुराधा शिवाजी खार्डे यांनी त्यास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व तु कशी काय नोकरी करतो, तुला तर एखाद्या दिवशी जीवाने मारून टाकू अशी धमकी दिल्याची घटना १ मे ल रात्री १० वाजता घडली.

विठोबा खार्डे यांनी आज २मे ला दुपारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी शिवाजी खार्डे, अनुराधा खार्डे, पुजा खार्डे यांच्या विरोधात भा द वी कलम २९४,३२३,५०६, ३४अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नारायण गिते करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये