ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२० वर्षीय युवकाचा संत चोखामेळा जलाशयात बुडून मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

खल्ल्याळ गव्हाण शिवारात असलेल्या संत चोखामेळा जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज२मे ला दुपारी तीन वाजता घडली.

मृतकाचे नाव महेफुज शेख मुख्यतार (२०) रा, खल्याळ गव्हाण आहेत.मृतक युवक पोहण्या च्या उद्देशाने जलाशयात उतरला मात्र पाण्याचा अंदाज चुकल्याने तो पाण्यात बुडाला व त्याच ठिकाणीं मरण पावला, घटनेची फिर्याद कृष्णा भानुदास जोशी राहणार खल्याळ गव्हाण यांनी पोलिस ठाण्यात दिली त्यानुसार पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नारायण गिते करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये