ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा मध्यवर्ती कारागृह वर्धा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

श्री सुहास पवार कारागृह अधीक्षक वर्धा यांनी केले झेंडावंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 1मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती कारागृह वर्धा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम श्री सुहास पवार कारागृह अधीक्षक वर्धा यांच्या हस्ते पार पडला सदर या कार्यक्रमाकरिता श्री नितीन क्षीरसागर वरिष्ठ तुरुंगाधिकारी उपस्थित होते तसेच श्री सुहास नागमोते यांनी परेडचे सूत्रसंचालन केले सदर कार्यक्रमाकरिता श्री भावसार तुरुंग अधिकारी उपस्थित होते.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त कारागृह अधीक्षक सुहास पवार यांनी शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले ध्वजारोहण कार्यक्रमाकरिता श्री शंकर वाघमारे श्री अशितोष बोंडे श्री अमित कोठाळकर श्री संदीप देशमुख श्री प्रमोद पहाडे श्री कुहिकार श्री चामलाटे श्री राठोड श्रीमती भारती ताजने श्रीमती आरती गायकवाड श्रीमती कोमल सांगळे श्री सोहन गुप्ता श्री ध्रुवास पठाडे इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनानिमित्त बंदी बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच भजन व इतर कार्यक्रमाची नियोजन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये