ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी-विदेशी व मोहा दारूची वाहतुक करणा-या आरोपीतांवर धडक कार्यवाही

एकूण 5 लाख 61 हजार 840 रू चा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पुलगाव पथक यांनी विदेशी दारूची विक्री करीता वाहतुक करणा-या आरोपीवर मौजा वायगाव (नि.) ते कापसी रोडवर सापळा रचुन दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, आरोपी हा मोक्कावर रंगेहाथ कार ने दारूची वाहतुक करतांना मिळुन आल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातुन 1) एक सिलव्हर रंगाची TOYOTA COROLLA कार क्र. MH-01/MA-4555 कि. 4,00,000 रू 2) विदेशी दारूने भरलेल्या ओ.सी. ब्लू. कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 72 सिलबंद शिशा कि 25,200 रू 3) विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 42 सिलबंद शिशा कि 14,700 रू असा जु.किं. 4,39,900 रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी 1) समद खान सोहेल खान पठान, वय 33 वर्ष, रा. वायगाव (नि.) .जि. वर्धा, 2) किरण कामडी रा. वायगाव (नि.) यांचेविरूध्द पो.स्टे. देवळी येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. तसेच देशी व मोहा दारूची वाहतुक करणा-या आरोपीतांवर दारूबंदीबाबत प्रो.रेड करून, आरोपीतांचे ताब्यातुन 1) एक पिवळ्या रंगाची HONDA GRAZIA मोपेड क्र. MH-32/AQ-4592 कि. 90,000 रू 2) देशी दारूने भरलेल्या गोवा संत्रा नं. 1 कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल. च्या 96 सिलबंद शिशा, कि 14,400 रू 3) एका प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 35 ली गावठी मोहा दारू, प्रती ली. 150 रू प्रमाणे कि 5,250 रू व कॅन कि 200 रू असा जु.किं. 1,09,850 रू चा माल जप्त करून आरोपी नामे 1) अभिलाश प्रल्हाद डफरे, वय 30 वर्ष, रा. नांदोरा(ड) 2) अमोल सुनिल तुरणकर, वय 28 वर्ष, रा. देवळी, 3) खुषाल कुमरे रा. देवळी यांचेविरूध्द पो.स्टे. देवळी येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला व दारू मालाची अवैधरित्या विक्री करणा-या आरोपीतावर कार्यवाही करून 1) देशी दारूने भरलेल्या टॅगो पंच कंपनीच्या प्रत्येकी 90 एम.एल. च्या 83 सिलबंद शिशा कि 6,640 रू 2) एका प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 35 ली. गावठी मोहा दारू, कि 5,250 रू व कॅन कि. 200 रू असा जु.किं. 12,090 रू चा माल जप्त करून, आरोपी 1) सिमा विनायक कांबळे, वय 40 वर्ष, रा. वायगाव (नि.), 2) किरण कामडी रा. वायगाव (नि.) यांचेविरूध्द पो.स्टे. देवळी येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. संजय गायकवाड सा. यांचे निर्देशाप्रमाणे, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये