Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र दिनी एन.सी.सी.छात्र सैनिकांची सलामी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : 65 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांनी तिरंग्याला रायफल सलामी देऊन महाराष्ट्र दिन साजरा केला.

प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले यांनी ध्वजारोहण केले. मंचावर एन.सी.सी.ऑफिसर तथा रासेयो कार्यक्रम समन्वयक कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. धनराज मुंगल उपस्थित होते.

या प्रसंगी एन.सी.सी. ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षेत प्राविण्य प्राप्त कॅडेट सिनिअर अंडर ऑफिसर शेखर भोगेकर, अंडर ऑफिसर अक्षय जबडे, अंडर ऑफिसर राखी खोडे, कंपनी सार्जंट मेजर वैष्णवी शिरभाते, सार्जंट प्रशिल अंदुरकर व संकेत गुजरकर यांना तसेच 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियन मधून एन.सी.सी. ‘बी’ प्रमाणपत्र परीक्षेत ‘ए’ ग्रेड मिळविणारी छात्र सैनिक खुशी पचारे यांना ‘एन.सी.सी. चषक देऊन गौरविण्यात आले.

प्रभारी प्राचार्य डॉ. ढाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. संचालन कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले. सदर सोहळ्यास एन.सी.सी.छात्र सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. ‘महाराष्ट्र दिन चिरायू होवो…’च्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये