ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अर्थ कंजरवेशन ऑर्गनायझेशन तर्फे ब्रम्हपुरीत जागतिक व्याघ्र दिवस साजरा

जंगल परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा जंगल संवर्धनात सहभाग हे व्याघ्र संवर्धनाची गुरुकिल्ली - ललित उरकुडे,जिवतज्ञ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी – भारतीय पौराणिक कथा, लोककथा प्राचीन काळापासून वाघांचे विशेष स्थान आहे. विदर्भातील वाघांचा भ्रमंती मार्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रम्हपुरी वन विभागातील ब्रम्हपुरी शहरात अर्थ कंजरवेशन ऑर्गनायझेशन तर्फे जागतिक व्याघ्र दिवस साजरा करण्यात आला.

शहरातील इंदिरा गांधी चौकात संस्थेच्या वतीने व्याघ्र संवर्धन संबंधित फलक हातात पकडुन स्वयंसेवकांनी जन जागृती केली.

दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात भारतातील वाघांची संख्या झपाट्याने कमी झाली,जंगलतोड करून अधिवास नष्ट करण्यात आले आणि वाघांच्या अवयवांची तस्करी या मुळे वाघांसह इतर वन्य सुध्दा धोका निर्माण झाला आहे.

या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष व नगरसेवक मनोज वठे,उपाध्यक्ष प्रफुल गभने,सचिव व जिवतज्ञ ललित उरकुडे,विवेक राखडे,श्रीगणेश बुराडे,सोहम कुथे,आर्यन राखडे,सूरज ठाकूर, अनुश्री मातेरे,चेतन राखडे, प्रशिल घोरमोडे,अंकिता मल्लिक,आचल कोरडे,आदित्य शंभरकर,साक्षी बल्लारपूरे,गणेश कोल्हे, यश पवार,कुणाल दोनाडकर ई. उपस्थित होते.

जंगल परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा जंगल संवर्धनात सहभाग हे व्याघ्र संवर्धनाची गुरुकिल्ली आहे.स्थानिकांमधे जागरूकता वाढवून आणि त्यांना संवर्धन प्रयत्नात सहभागी करून मानव – वन्यजीव संघर्ष कमी करू शकतो.समुदाय आधारित संवर्धन उपक्रम आणि जबाबदारीची भावना निर्माण करून वाघांची संख्या वाढवण्यासाठी स्थानिक नागरिक मोलाची भूमिका निभवू शकतात.

– ललित उरकुडे,जिवतज्ञ

ब्रम्हपुरी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये