ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे बैलमपूर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे आजूबाजूच्या गावाचा आरोग्याकडे लक्ष देत आज बैलमपूर येथील अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केलेत.

या शिबिरात एकूण 107 वृद्ध महिला व पुरुष यांची तपासणी करून त्यांना औषपचार करण्यात आला तर एकूण 70 लोकांच्या डोळ्याचा नंबर काढून चष्मा बनविण्याकरिता पाठविण्यात आला.

पुढील 1 हफ्तायामध्ये सर्व 70 लोकांना चष्मा बनवून वाटप करण्यात येणार आहेत.

या शिबिरात नेत्र चिकित्सक, चंद्रपूर ड्रॉ. पराग टेम्भूर्णे व त्याच्या पथकाची उपस्थिती होती. तसेच गांवतील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस आशा वर्कर व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्टीत नागरिक यांची उपस्थिती होती.

या शिबिराला यशस्वी करण्यास सी.एस. आर.टीम माणिकगड ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये