ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरटी रेती वाहतुक करणाऱ्या ५ आरोपीतांविरूद्ध गुन्हा नोद

एकूण ४१ लाख १० हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

           दिनांक 28/04/2024 रोजी पोलीस स्टेशन समुद्रपूर चे ठाणेदार श्री. स. पो. नि. संतोष शेगावकर साहेब यांना खात्रीशिर माहिती मिळाली कि, मौजा वाकसुर शिवारातील वणा नदीच्या पात्रातुन काही इसम हे जे.सी. बी. च्या साहय्याने ट्रॉक्टर मध्ये विनापास परवाना काळी रेती चोरून वाहतुक करीत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने मा. ठाणेदार साहेब यांचे मार्गदर्शनात पो. स्टे. समुद्रपूर येथील डि. बी. पथक यांचे सह जावुन आरोपीतांवर नाकेबंदी करून त्यांचे ताब्यातुन एक जे.सी.बी मशीन, व दोन ट्रॅक्टर ट्रॉलीत वणा नदीच्या पत्रातुन चोरून भरलेली दोन ब्रास काळी रेती असा जुमला किमत 41,10,000 रू चा मुददेमाल जप्त करून आरोपी नामे 1) युवराज रामहरी कारमोरे रा. कानकाटी 2) श्रावण रामचंद्र सिंडाम रा. हरणखुरी 3) प्रकाश वसंत पाटील रा. कानकाटी 4) नरेश विठलराव धोटे रा. रामनगर 5) दिनेश श्रावण सराटे रा. रामनगर ता. समुद्रपूर जि. वर्धा यांचे विरूध्द पो. स्टे. समुद्रपूर येथे कलम 379, 34 भा. द. वि. सहकलम 3(1), 181, 50(1), 130/177 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन सा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. याचे निर्देशाप्रमाणे मा. स.पो.नि. संतोष शेगावकर ठाणेदार पो. स्टे. समुद्रपूर याचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि. बि. पथक प्रमुख पोलीस नाईक प्रमोद थुल, सचिन भारशंकर, पोलीस अंमलदार प्रमोद जाधव, समिर कुरेशी यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये