ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घराचा दरवाजा तोडून चोरांनी ४० हजार रुपयांचा ऐवज केला लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

घराचा मागचा दरवाजा तोडून चोरांनी घरात प्रवेश करून घरातील ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना त्र्यंबक नगर देऊळगाव राजा येथे २६ एप्रिल ला पहाटे घडली.

सविस्तर वृत्त असे की, त्र्यंबक नगर देऊळगाव राजा येथील रहिवासी संदीप मंनालाल धनावत यांच्या घराचा मागचा दरवाजा तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करून घरातील नगदी ३०हजार रुपये, सोन्याची नथ, किंमत ३हजार रुपये, २५चांदीचे शिक्के किंमत २हजार रुपये, चिल्लर नाणे ५हजार, कन्फ्ल्यूंयंट कंपनी ची बॅग त्यात असलेले आय डी कार्ड व भारत सरकारचा पासपोर्ट असा एकूण ४०हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये