ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवणे पडले महागात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

उन्हाळा चे दिवस असल्याने रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवणे महागात पडले आहे, चोरट्यांनी या सुवर्ण संधी चा फायदा घेऊन घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना सिंनगाव जहांगीर येथे घडली आहे.

भानुदास आनंदा बोबडे यांचा मुलगा व सून उन्हाळा चे दिवस असल्याने रात्री घराचा दरवाजा उघडा ठेऊन घरात झोपले होते,घर उघडे असल्याचा फायदा घेत चोरांनी घरात प्रवेश करून घरातील लोखंडी पेटीत असलेले एक ग्रॅम सोन्याची अंगठी,किंमत ३हजार रुपये, साडे तीन ग्रॅम चे बास्केट रींगजोड, किंमत १०हजार रुपये,तीन ग्रॅम चे झुंबर चे फुल, किंमत ९हजार, लहान मुलीची पाटली तीन जोड किंमत ५हजार रूपये, पैठणी साडी किंमत एक हजार रुपये, व रोख ५हजार रुपये, असा एकूण ३३ हजार रुपये चा ऐवज लंपास केला,बोबडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये