ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदर्श हिंदी प्राथमिक विद्यामंदिर येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून गडचांदूर येथील उपक्रमशील शाळा आदर्श हिंदी विद्यामंदिर येथे चार दिवसीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीचे उद्घाटन व परीक्षण कृषी स्प्रे पंप मुरली बॅटरीचे निर्माता श्री इंजिनीयर राकेश पेटकर यांनी केले. सदर 8 प्रदर्शनात विद्यालयाच्या 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

माध्यमिक गटात कल्पना राम च्या स्टीम वॉटर पावर प्लांट या मॉडल ला प्रथम क्रमांक तर कोमल केवट च्या वॉटर पुरिफिकेशन मॉडल ला द्वितीय तर समर केवट एटीएम मशीन ला तृतीय .क्रमांक मिळाला, प्राथमिक गटात संजना साह च्या होलोग्रफिक इमेज ला प्रथम संजना केवट च्या गणितीय मॉडेल ला द्वितीय, नयना व सायना निषाद च्या जलशुद्धीकरण संयंत्र ला तृतीय क्रमांक मिळाला. प्रदर्शनीचे बक्षीस वितरण स्टुडन्ट फोरम कोरपना चे मुख्य संघटक पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल देरकर व इंजिनीयर तुषार देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शनीला विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही भेट दिली व मुलांचे कौतुक केले.

याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मंजुषा मत्ते यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राकेश पेटकर व अनिल देर कर यांच्यासारखा समाजाच्या व देशाच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी करावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक श्री अनंत काळे यांनी केले तर संचालन श्री पुरुषोत्तम बोरकर यांनी केले व आभार श्री अनिल भारती यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये