ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेडनेट बीजोत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या 

सिनगाव जहागीर आणि पांगरी माळी येथील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कड़े मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

        २६ फेब्रुवारी रोजी तालुक्यात गारपीटीचा तडाखा सर्वाधिक बसला असून इतर पिकांबरोबर फळबागांचे व शेडनेटचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यात शेडनेट ला विमा कंपनी काढून नुकसान भरपाई मिळत नसल्याने उपाशी मरण्याची वेळ आली आहे. तरी शासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या झालेले नुकसान ची भरपाई द्या अशी मागणी सिंनगावं व पांगरी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे.

        जिल्ह्यासह देऊळगाव राजा तालुक्यात दि.२६ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपीटचा जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक व फळभाज्यांचे तसेच शेडनेट मधील सर्व प्रकारची पिके उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची पिके वाया गेली त्यामुळे त्यांचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकारी हवालदील झालेला आहे. मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्या मुळे परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच शेडनेट शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे. शेडनेट मधे टोमॅटो मिरची काकडी कारले खरबूज टरबूज विविध प्रकारचे बीज उत्पादन घेतले जात आहे. यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने मुळे शेतकऱ्यांना बियाणाचा मूळभाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तरी शासनाच्या वतीने याची दखल घेण्यात यावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.

अशी मागणी सिनगाव जहागीर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कड़े मागणी केली आहे. या निवेदनावर रामकृष्ण डोईफोडे, देवानंद काकड, समाधान डोईफोडे, विलास घोडके, वैभव डोईफोडे, बद्री भाऊ वाघ,रामेश्वर वाघ, धुराजी वाघ, अशोक वाघ, दगडोबा वाघ,धुराजी वाघ,भरत वाघ, किरण वाघ, उषा डोंगरे,नामदेव वाघ,योगेश वाघ, विशाल वाघमारे,अशोक वाघ, सुरेश गायकवाड,प्रकाश सोनवणे, अमोल वाघ, अजय वाघमारे, बळीराम वाघ,भगवान गिराम, रामकृष्ण गिराम, भानुदास वाघ, सखाराम वाघ ,बाळासाहेब वाघ, विष्णू वाघ,ज्ञानेश्वर सोनुने,कुंडलिक वाघ, प्रकाश खंदारे, विनायक जेवळ, विष्णू वाघ,गणेश वाघ,संजय वाघ,आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये