ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मृतकाचा अंत्यविधी करिता मृतकाच्या आईकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने तिच्या विनंतीवरून दफननिधी

मृतकाची एकमेव नातेवाईक असून अन्य कोणी नातेवाईक उपलब्ध नाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन देवळी मर्ग क्रमांक 26/2024 कलम 174 CRPC मधील मृतक नामे नागोराव हुसेन कांबळे वय ४५ वर्ष याचे जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे पीएम करण्यात आले व त्यानंतर मृतकाची आई नामे सुमित्राबाई हुसेन कांबळे वय 76 वर्ष यांच्या ताब्यात देण्यात आले.

परंतु मृतकाची आई ही अत्यंत वयोवृद्ध असून वायगाव परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करते तसेच ती मृतकाची एकमेव नातेवाईक असून अन्य कोणी नातेवाईक उपलब्ध मिळून आले नाही. मृतकाचा अंत्यविधी करिता मृतकाची आईकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने तिच्या विनंतीवरून मृतकास सेवाग्राम येथील दफनभूमी मध्ये हिंदू परंपरेप्रमाणे मृतकाची आई हिचे समक्ष दफनविधी करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये