ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयाचे सुयश

शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थी उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय सावली येथील सत्र २०२३- २०२४ सत्रात १८ फेब्रुवारी २०२४ ला राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा  घेण्यात आली. सदर परीक्षेमध्ये  विश्वशांती विद्यालय सावलीचे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात निखिल चरणदास मांदाळे आणि कू.गार्गी सचिन जक्कुलवार यांनी सुयश प्राप्त केले.

त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम, विषय शिक्षक रवींद्र कन्नाके,प्रवीण काटपल्लीवार,प्रथमेश वारजुरकर, वर्गशिक्षक राजेश मांदाडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले.सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये