ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दादाभाई नौरोजी वॉर्ड येथील अवैध रेती साठा जप्त 

महसूल विभागचीं कारवाई 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- येथील दादाभाई नौरोजी वॉर्ड येथे pwd चे सुषमा स्वराज हि्यूमन डेव्हलोपमेंट केयर सेंटर चे बांधकाम चालू आहे. तेथेच बाजूला 24ब्रास रेती खूब दिवसा पासून साठवणूक करून होती. बल्लारपूर तहसील चे महसूल विभाग चे बल्लारपूर पटवारी अजय नोकरकर, अमोल डोंगरे, देवानंद रामटेके याचा चमुने एका ट्रॅक्टरचा पाठलाग करते वेळी टेकडी वरून खाली येत असतांना अचानक प्रगट जागृत हनुमान मंदिर जवळील समोरचा पटागांनावर अवैध रेतीचा साठवणूक करून तीन ठिगले दिसून आले.

पटवारी अजय नोकरकर आणि त्यांची चमू ने तिन्ही ढीगले वर कारवाई करून त्यावर पंधरा चुना टाकण्यात आला आणि पंचनामा करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई sdo चरडे, तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे यांचा मार्गदर्शन मध्ये पटवारी नोकरकर व टीम ने केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये