ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवटोक येथे महाशिवरात्री यात्राचे आयोजन

गंगा आरती व गोपालकाल्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनी काठावर असलेले श्री मुरकुंडेश्वर मंदिर देवटोक येथे महाशिवरात्री निमित्त यात्रेचे आयोजन व गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर पंच कमिटी देवस्थान च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसाची भव्य यात्रा भरविण्यात येणार आहे.नवीन मंदिर खोदकाम करीत असतानाच या ठिकाणी भव्य शिवलिंग या ठिकाणी सापडली तेव्हा पासून वर्षभरात हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.तसेच या वर्षी शासनाने ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ ही घोषित केले आहे.

या शिवरात्री महोत्सव मध्ये ट्रस्ट चे अध्यक्ष तथा संत मुरलीधर महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे.

 दिनांक 8 ला सकाळी 9 वाजता सचिन तंगडपल्लीवार व प्रशांत बोमनवार दोन जोडपी हे सपत्नीक शिव अभिषेक करणार आहे. तसेच दोन दिवसांपासून भ्रमनावर निघालेली पालखी देवटोक येथे पोहचणार आहे.दुपारी 2:30 वाजता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पूजा होणार आहे.सायंकाळी 7 वाजता 1 हजार दीप उजळून गंगा आरती होणार आहे.तसेच रात्रौला भजन होणार आहे. दिनांक 9 ला दुपारी 12 वाजता कीर्तन व गोपाल काला व महाप्रसाद होणार आहे.तरी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून शिव दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकेण्डश्वर पंच कमेटी देवस्थान ट्रस्ट देवटोक यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये