ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कान्सा ( शिरपूर ) च्या बहुसंख्य ग्रामस्थांचा  शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश

जागा उपलब्ध करुन द्यावी, गावातील युवकांसाठी  “स्व. बाळासाहेब ठाकरे वाचनालय” सुरू करू - रविंद्र शिंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासून पक्षाचा सन्मान, आपला आब व सोज्वळ राजकारणाचा आदर्श कायम ठेवला आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण हे ब्रीद जोपासत त्यांचे जनसेनेचे  कार्य सतत सुरू आहे. याच नितीला चंद्रपूर जिल्ह्यातील 75-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात राबविण्याचे काम शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे सामाजिक कार्याला प्राधान्य  देवून करीत आहे. विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने वरोरा व भद्रावती तालुक्यातील कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत.
भद्रावती तालुक्यातील जवळपास 500 लोकसंख्या असलेले कान्सा (शिपूर)  गाव. गावात असंख्य सार्वजनिक  समस्या आहेत. गावातील समस्या रविंद्र शिंदे मार्गी लावू शकतात. हा दृढ विश्वास मनात ठेवीत यांना साथ द्यायची असे ठरवित कान्सा ( शिरपूर ) गावातील बहुसंख्य जेष्ठ, युवा, महिला यांनी शिंवबंधन बांधीत पक्ष प्रवेश घेतला.

विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उप-जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या मार्गदर्शनात, भद्रावती तालुका प्रमुख नंदु पढाल व नंदोरी-कोकेवाडा विभाग प्रमुख हरीभाऊ रोडे यांच्या नेतृत्वात अनिल मत्ते, पुरुषोत्तम चौधरी, विकास मत्ते, शेखर घुगुल, प्रशांत पिदुरकर, शंकर रोडे, वसंता मत्ते, विलास गेडाम, वामन रोडे, देवराव पिदुरकर, विजय आसुटकर, भास्कर मत्ते, भास्कर पिदुरकर, प्रकाश मत्ते, सुनिल रोडे, ललीत पिदुरकर, गजानन कुंभारे, अजय आसुटकर, अक्षय चौधरी, नंदकिशोर रोडे, सुनिल मत्ते, प्रविण टोंगे, विकास नैताम, केशव पेंदाम, मारोती निखाडे आणि  राजु आसुटकर तसेच महिला वर्गातून बयनाबाई गेडाम, कुसुम रोडे, मंदा पिदुरकर आणि शारदा आसुटकर आदीनी गावकऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश घेतला.

या पक्षप्रवेश सोहळयाला भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना जिल्हा सरचिटणीस येशु गार्गी, भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोहन कुटेमाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मत्ते, महादेव रोडे, नामदेव टोंगे, संजय किन्नाके, रामराव मडावी, जयदीप मिलमिले, महादेव आसुटकर, मंगला झाडे, ‍शशिकला टोंगे, गिता मत्ते तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक, जेष्ठ, युवा व महिला वर्ग फार मोठया संख्येत  उपस्थित होते.

या पक्षप्रवेश प्रसंगी “कान्सा गावकऱ्यांनी वाचनालयाकरीता गावात जागा द्यावी, मी गावातील युवक- युवतीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे वाचनालय सुरू करणार आहे.” असे विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे म्हणाले, तसेच गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरीता प्राधान्याने कार्य करेन .असे पुढे म्हणाले.

रविंद्र शिंदे यांनी याप्रसंगी कान्सा गावातील सरपंच मयुर टोंगे यांची प्रकृती बरी नसल्याने कार्यक्रम समारोपा नंतर मयुर टोंगे यांच्या घरी जावून प्रकृतीची विचारपूस केली. तसेच कोणतीही आरोग्याविषयक मदत लागल्यास शिवसैनिक सदैव तत्पर आहे, फक्त एक हाक द्या, सर्वतोपरी मदतीचा विश्वास दिला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये