Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या तालुकाध्यक्ष पदी विजय वानखेडे यांची निवड

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :
भारतीय जनता पक्षात मागील कित्येक वर्षा पासून कार्यरत असलेले तसेच मांगली (रे) ग्रामपंचायत सदस्या पासून भाजपा कार्यालय प्रमुख ते जिल्हा परिषद सदस्य, भाजपा अनु.जाती मोर्चा जिल्हा अध्यक्षाचे पदे भूषविणारे आणि जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणारे भाजपचे कार्यकर्ते विजय रामदास वानखेडे यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्याअध्यक्षपदी पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री वने,
सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई व जिल्हाधिकारी साहेब विनय गौडा चंद्रपूर यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.
विजय वानखेडे यांनी पक्षात विविध पदाच्या माध्यमातून पक्ष संघटनेच्या जबाबदारी सांभाळत असतांनी जनसामान्यात एक आपला हक्काचा कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी पार पाडत जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात आपल्या क्षेत्राच्या बाहेर सुद्धा विविध विकासात्मक कामे केली. विजय वानखेडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदावरून पायउतार झाल्यानंतर सुध्दा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भारत सरकार ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज भोंगळे यांच्या माध्यमातून 2 कोटी 27 लाखांच्या विविध विकासकामाला मंजुरी मिळवून भद्रावती क्षेत्रातील सिंचनाचे कामे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट, खासदार निधी 3054 लेखाशिष्र अतंर्गत कामे, जिल्हा नियोजनातून रस्ते बांधकाम, नविन शाळेचे बांधकाम, ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम, पंचायत समिती ला संरक्षण भिंतीचे बांधकाम, शाळेच्या शौचालयाचे बांधकाम, विकलांग विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा साठी विविध उपाययोजना, स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सुध्दा रस्ता नसणारे गावं कुरोडा गावाला जाणारा रस्त्याचे खडीकरणाचे बांधकाम आणि तिन वर्ष संघर्ष करुन सतत पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पत्र व्यवहार करुन भद्रावती येथे नाविन्यपूर्ण पोलिस स्टेशन ची इमारत व कर्मचारी वसाहत उभी केली. असे क्षमता ठेवणारे विजय वानखेडे यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी चे नेते ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रपूर, मंत्री वने, मत्स्यपालनव्यवसाय विकास व सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य, मा . केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भारत सरकार ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर , भाजपचे राजुरा विधानसभा प्रमुख व माजी अध्यक्ष देवरावजी भोंगळे, भाजपाचे वरिष्ठ नेते विजयभाऊ राऊत भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिष जी शर्मा, चंद्रकांत गुडेवार , अशोक जी हजारे , वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख रमेश जी राजुरकर,नामदेवभाऊ डाहुले,तुळशीराम श्रीरामे, नरेंद्र जिवतोडे, प्रविन सातपुते, किशोर गोवारदिपे, मा . प. स. सभापती प्रवीण ठेंगणे, न. प. गटनेते प्रशांत डाखरे, संजय वासेकर, सुनिल नामोजवार, अमित गुडांवार, अफजल भाई, माधव बांगडे, मारोती गायकवाड, प्रवीण सुर , महेश टोंगे, अतुल जिवतोडे, संजय पारखी, केशव लांजेकर, महिला आघाडीच्या नेत्या लता भोयर, अर्चना जिवतोडे, प्रणीता शेंडे, विद्या कांबळे, वंदना सिंना,माणुसमारेताई, रक्षिता निरंजने व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडी बद्दल अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये