Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

डॉ एस आर रंगनाथन यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

चांदा ब्लास्ट :
अतुल कोल्हे भद्रावती :-
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ अपर्णा धोटे प्राध्यापक डॉ शशिकांत शित्रे व ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापक संदीप प्रधान उपस्थित होते.

सर्वप्रथम भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण व पाहुण्यांच्या स्वागताने सुरुवात झाली याप्रसंगी ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापक संदीप प्रधान यांनी डॉ एस आर रंगनाथन यांच्या जीवनकार्याचा परिचय देताना त्यांच्या जन्मदिन संपूर्ण देशात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो तसेच ग्रंथालय शास्त्रातले पाच नियमांचे महत्त्व स्पष्ट आपल्या प्रास्ताविकेतून केले.

तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी शैक्षणिक जीवनात ग्रंथाचे महत्त्व किती व कसे आहे ते उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच आज विद्यार्थ्यांच्या मोबाईलचा अतिवापर व त्यामुळे होणारी हानी व यांचे जीवनावर पडणारा परिणाम यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे संचालन ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापक संदीप प्रधान तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ शशिकांत शित्रे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक डॉ अपर्णा धोटे श्री विजय मदनकर यांनी अथक परिश्रम घेतले या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये