ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसील कार्यालय येथे महसूल सप्ताह निमित्त ( जनसंवाद ) कार्यक्रम

अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदवाही – सिंदेंवाही तहसील कार्यालयात महसूल सप्ताह निमित्ताने मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री. श्रीकांत देशपांडे व SDM अधिकारी श्री. महाजन यांचा प्रमुख उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रम पार पडला

 सदर कार्यक्रमामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रपूर व SDM अधिकारी यांनी सलोखा योजना , वहिवाट रस्ते, शेती विषयक अतीक्रमण रस्ते व नैसर्गिक आपत्ती , या विषयी करावयाचा उपाययोजना या बाबत उपस्थित शेतकरी तसेच नैसर्गिक आपत्ती शासकीय कर्मचारी यांना मार्गदर्शन केले . तसेच कार्यक्रमा दरम्यान लाभार्थ्यांना (आत्महत्या ग्रस्त शेतकरी, रेशनकार्ड, विविध दाखले) लाभाचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाला मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रपुर देशपांडे, SDM महाजन,तहसिलदार शिंदे,नायब तहसीलदार धात्रक, मंडळ अधिकारी, महसूल अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व तलाठी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन,प्रास्ताविक सिंदेंवाही तहसीलदार शिंदे यांनी केले तर आभार नायब तहसीलदार धात्रक यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये