ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर : मनपा आयुक्त अकुनूरी नरेश

मिरवणूक व विसर्जन मार्गांची प्रत्यक्ष पाहणी; खड्ड्यांच्या तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक १८०० ३०९ ७०४० उपलब्ध

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते खड्डेमुक्त व सुरक्षित करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे पाऊले उचलण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या स्थितीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीतील निर्देशांनुसार, चंद्रपूर मनपा आयुक्त अकुनूरी नरेश यांनी गणेशमूर्तींच्या आगमन, मिरवणूक तसेच विसर्जन मार्गांची संबंधित विभागप्रमुख व अभियंत्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.

    पाहणीदरम्यान आढळून आलेले सर्व खड्डे युद्धपातळीवर आणि दर्जेदार पद्धतीने तातडीने दुरुस्त करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त अकुनूरी नरेश यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविक, नागरिक व गणेश मंडळांना कोणतीही अडचण भासू नये तसेच उत्सव सुरक्षित व सुरळीत पार पडावा, यासाठी मनपा प्रशासनाकडून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

नागरिकांसाठी टोल-फ्री तक्रार निवारण सुविधा –

शहरातील कोणत्याही रस्त्यावर खड्डे किंवा रस्त्यांशी संबंधित समस्या आढळल्यास नागरिकांना थेट तक्रार नोंदविता यावी, यासाठी महानगरपालिकेने १८०० ३०९ ७०४० (1800 309 7040) हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित प्रभागामार्फत तातडीने खड्डे दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल.

गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी शहरवासीयांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतची माहिती टोल-फ्री क्रमांकावर देऊन मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये