जंतरमंतर येथील आंदोलनात झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नागभिड येथे बंदची हाक देऊन मोर्चा काढून निवेदन

चांदा ब्लास्ट. प्रतिनिधी सुधाकर श्रीरामे
चंद्रपूर :- जिल्ह्यातील नागभीड येथे वंचित बहुजन आघाडीचे वतीने दिल्ली येथील जनतामंतर येथील नीट परीक्षेत झालेल्या पेपर फुटीमुळे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी जंतर मंतर येथे काकरोज जनता पार्टीचे वतीने सोनम वाचू यांच्या मार्गदर्शनाखाली एक जुलै पासून आंदोलन सुरू करण्यात आले असताना २० जुलै रोजी सोनम वाचू यांना तब्येत खालावली असताना त्यांना दवाखान्यात नेण्यात आले मात्र त्याच दिवशी जंतर मंतर वर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर लाठीकाठी हल्ल्या करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थी जखमी झाले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट घेऊन आंदोलन करून पदिंबा दिला. कॅक्रोज जनता पार्टीचे वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे वतीने आज महाराष्ट्र बंडाची हाक देण्यात आली. नागभिड येथील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष चंदन कोसे यांचे नेतृत्वात राम मंदिर चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना ( उ बा टा) पक्ष, काँग्रेस पक्ष यांनी सहभाग घेतला. नागभिड येथील राम मंदिर चौकात आंदोलन सुरू असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाला संबोधित केले. देशात अराजकता निर्माण करून देशाचे शिक्षण, बेरोजगार यांना न्याय देण्यापेक्षा यांचे भवितव्य बरबाद करण्याचे धोरण हे सरकार करीत आहे. वंचित बहुजन आघाडीचे वतीने मोर्चा काढून तहसीलदार देशमुख यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष चंदन कोसे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष भास्कर शिंदे, काँग्रेसचे दिनेश गावंडे यांची उपस्थिती होती तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन शांततेत पार पडले यावेळी पोलिसाचा चोख बंदोबस्त तैनात केला होता



