गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे संस्थापक माजी आमदार विठ्ठलराव धोटे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे संस्थापक अध्यक्ष राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, ज्येष्ठ लोकनेते विठ्ठलराव धोटे , वय 92 वर्ष,यांचे आज दिनांक 18 मे ला सकाळी सात वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राजुरा विधानसभा क्षेत्राने एक दूरदृष्टी असलेले अनुभवी, अभ्यासू व जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे नेतृत्व गमावले आहे.
स्व. विठ्ठलराव धोटे यांनी आपल्या कार्यकाळात राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विकासात्मक वाटचालीत मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जपत त्यांनी विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या कार्याची आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्वाची आठवण सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभाताई, मुलगा रवी, मुली, सुना, जावई, नातवंडे तथा बराचं मोठा आप्त परिवार आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे यांचे ते वडील होत, तसेच राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथील प्राचार्य डॉ अनिल चिताडे यांचे सासरे होते.



