गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन तळेगाव (शापं) अंतर्गत आरोपीतावर जुगार कायद्यान्वये रेड

एकूण ३ लाख ८२ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       आज रोजी स्था. गुन्हे शाखा, वर्धा द्वारे पो. स्टे.तळेगाव (शापं) हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबवित असताना गोपनीय माहितीचे आधारे मौजा वाघोडा शिवारात जुगार रेड केला असता यातील आरोपी हे सार्वजनिक ठिकाणी 52 तास पत्त्याचा पैशाचे हारजिचा जुगार खेळतांना मिळून आले. आरोपीतांचे अंग झडतीमध्ये व डावावर नदी रोख तसेच मोक्यावरून 5 मोटर सायकल व 1 मोपेड गाडी असा एकूण जुमला किंमत 3,82,860/- रू चा मुद्देमाल पंचनामाप्रमाणे ताब्यात घेऊन आरोपी 1) संदिप रामदास ढोबळे वय 43 वर्ष, रा.तिवसा जि.अमरावती  2) राजेश सीतारामजी दहिवडे, वय 55 वर्ष, रा. किन्हाळा3) अनिल परसराम डोंगरे, वय 37 वर्ष, रा. पालोरा4) रणजीत मत्रुजी भोसले, वय 39 वर्ष, रा. भिवापूर5) योगेश अशोकराव सोमनाथ, वय 32 वर्ष, रा. सरवाडी6) श्रावण मरस्कोल्हे, रा.एकार्जुना (पसार)7) सुनील भादे, रा. देववाडी (पसार) यांचे विरुद्ध पो.स्टे. तळेगाव (शा.पंत) येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

     सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. डॉक्टर सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, मनीष कांबळे, प्रदीप वाघ यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोस्ट तळेगांव (शा.पंत) येथील पोलीस करीत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये