ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजेश बेले यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या कारवाईच्या सूचना

सन फ्लाग आयरन अँड स्टील कंपनीवर प्रदूषणाची चौकशी होणार

चांदा ब्लास्ट

सन फ्लाग आयरन अँड स्टील कंपनी लिमिटेडच्या बेलगाव अंडरग्राउंड कोळसा खाणी प्रकल्पामुळे घातक रासायनिक जल आणि वायु प्रदूषण होत असल्याचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने प्रतिकात्मक पुतळा बसवून शोभायात्रा काढण्याचा आणि जिल्हाधिकारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा दिला होता. या गंभीर आरोपांनंतर अपर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी तातडीने कारवाई करत उपविभागीय अधिकारी, प्रादेशिक अधिकारी (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी २५ एप्रिल २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून सन फ्लाग कंपनीच्या खाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार केली होती. पत्रात त्यांनी म्हटले होते की, खाणीतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक द्रव्यांमुळे परिसरात घातक वायु आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे जलचर प्राणी, वन्य प्राणी आणि पाळीव प्राणी आजारी पडत आहेत.

या गंभीर आरोपांनंतर जिल्हा प्रशासनाने त्वरित कारवाई सुरू केली. अपर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आणि तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच, शिबिराचे आयोजन करण्याचे आणि प्रदूषणाचे प्रमाण तपासण्याचे आदेश दिले.

संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने जिल्हाधिकारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्वरित कारवाई केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये