ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केपीसीएल प्रकल्पग्रस्त शेतकरी, कंत्राटी कामगारांच्या व्यथा व गाऱ्हाणी हंसराज अहीर यांनी ऐकूण घेतल्या

२४ जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोगाची सुनावणी

चांदा ब्लास्ट

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी. (केपीसीएल) च्या बरांज कोळसा खाणीशी संबंधित इतर मागासवर्गीय अन्य प्रकल्पग्रस्त शेतकरी कंत्राटी कामगार, अन्यायग्रस्त कंत्राटदार, स्थानिक प्रकल्पपिडीत नागरीकांच्या अडचणी, समस्या, तकारी व गाऱ्हाणी ऐकुण घेत त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची लवकरच सोडवणूक केली जाईल असे आश्वासन दिले.
भद्रावती येथील शासकीय विश्रामगृहात दि. २२ जुलै २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये उपस्थित प्रकल्पग्रस्त शेतकरीबांधव, कंत्राटी कामगार, कंत्राटदार यांच्या संयुक्त बैठकीस मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर यांनी केपीसीएलशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्नांना घेवून विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे दि. २४ जुलै रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे सुनावणी घेण्यात येईल अशी माहिती दिली. य प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी शेतकरी प्रभावीत झाले असल्याने त्यांच्यावरील अन्यायाची गंभीर दखल राष्ट्रीय ओबीसी आयोगाद्वारे घेण्यात आली आहे.
या संदर्भात माध्यमांशी बोलतांना हंसराज अहीर यांनी सांगीतले की, केपीसीएलशी संबंधित अनेव विषय अजुनही प्रलंबित आहेत, जमिनीच्या मोबदल्यात १४० कोटी रुपयांची शेतकऱ्यांना थकबाकी घेणे आहे. सुमारे ६०० हुन अधिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कंपनीने नोकऱ्या दिलेल्या नाहीत, नोकरीच्य बदल्यात ५ लाख रुपये संबंधित कुटूंबियांना देण्यात आलेले नाही, कोल हायपॉवर कमेटीच्या (HPC) निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी झालेली नाही, खदान बंद असल्याने अनेक कामगारांचे वेतन प्रलंबित आहेत पुनर्वसनाचा प्रश्न सुध्दा रेंगाळलेला आहे स्थानिक कंत्राटदारांची लाखो रुपयांची देयके मागील 9 वर्षांपासून थकित आहेत पिडीत प्रकल्पग्रस्त, कामगार व कंत्राटदार मागासवर्गीय असल्याने आयोगाने त्यांच्या प्रश्नांना गांभिर्याने घेतले आहे. याबाबत शीघ्रतेने निर्णय होण्याकरीता राष्ट्रीय ओबीसी आयोग गंभीर असल्याचेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
सदर बैठकीस सर्वश्री रमेश राजूरकर, डॉ. भगवान गायकवाड, विजय वानखेडे, सुनिल नामोजवार प्रशांत डाखरे, किशोर गोवारदिपे माधव बांगडे, गोपाल गोसवाडे, मधूकर सावनकर, गोविंदा बिजवे, संजर रॉय उपविभागीय पोलिस अधिकारी नोपानी, तहसीलदार सोनवने, पोलिस निरीक्षक इंगळे, नितीन चालखूरे प्रदिप मांडवकर, राकेश बोमनवार, विशाल दुधे, संगिता कोवे, सुरेखा कुमरे यांचेसह केपीसीएलचे प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव, कंत्राटी कामगार व अन्यायग्रस्त कंत्राटदार उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये