ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज मध्ये महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला, सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यावेळी प्राचार्य श्री. जमीर शेख, उपचार्य श्री. अनिल खुजे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.

६ डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांचं समाजातील अतुलनीय योगदान स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो लोक आणि अनुयायी जमतात.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महापरिनिर्वाण दिवस आहे. ६ डिसेंबर २०२५, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून गणला जातो.

या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये