ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शालेय आट्या पाट्या विभागीय क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय,सोनुर्लीचा संघ उपविजेता 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

    विभागीय आट्या पाट्या क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली येथील 19 वयोगटातील मुलांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला.तिसऱ्यांदा उपविजेता ठरला.हे विशेष. तर 14 वर्ष वयोगटातील मुलांनी मैदानावर उत्कृष्ट खेळ दाखविला.सर्व प्रेक्षकांची व क्रीडा आयोजकांची वाहवा मिळवली.

      ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सतत केलेल्या मेहनतीचे हेच यश मानावे लागेल.सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. यासाठी पालक, मा.संचालक मंडळ गडचांदुर व मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सततच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे यश लाभले..

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये