ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. भोंगळे यांच्या जन्मदिवसानिमित्त २५८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 “रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान” या सामाजिक संदेशाला उजाळा देत कोरपना येथे शुक्रवार, दिनांक २१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल २५८ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. हे रक्तदान शिबिर आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कोरफना येथे श्री देवराव दादा भोंगळे मित्रपरिवार कोरपना यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे संपूर्ण तांत्रिक पर्यवेक्षण लाईफ लाईन ब्लड सेंटर, रामदासपेठ नागपूर यांच्या मार्फत करण्यात आले. शिबिराला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, तसेच नगरवासीयांनी मोठ्या संख्येने भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. शिबिरात युवक-युवतींसह विविध वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने रक्तदान केले. शिबिरादरम्यान वैद्यकीय पथकाने सर्व रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी केली. स्थानिक पातळीवर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान झाल्याने भविष्यात गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा शहर अध्यक्ष अमोल आसेकर,. संयोजक पुरुषोत्तम भोंगळे,. नगरसेवक किशोर बावणे,नगरसेवक सुभाष हरबडे, नगरसेविका गीताताई डोहे,नगरसेविका वर्षाताई लांडगे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश खडसे,भाजपा शहर मंत्रीअबरार अली, युवा मोर्चा शहराध्यक्ष पवन बूरेवार, प्रमोद कोडापे तालुका कोषाध्यक्ष,विजय पानघाटे, सुनील देर कर, ॲड पवन मोहितकर, पुंडलिक उलमाले, पद्माकर दगडी, जोशनाताई वैरागडे,सत्यवान घोटेकर,संतोष बोरडे,धम्मा कापसे,जगदीश पिंपळकर, अलकाताई रणदिवे, प्रमोद पायघन, दिनेश ढेंगळ, शैलेश परसुटकर, सचिन डाखरे, शंकर चिंतलवार, आदी पदाधिकारी,व कार्यकर्ते तसेच लाईफ लाईन ब्लड सेंटरच्या टीमचे विशेष योगदान राहिले. या उपक्रमामुळे कोरपना तालुक्यात सामाजिक जाणीव आणि मानवसेवेची परंपरा अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये