ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यात्रेत आलेल्या महिलेच्या पर्स मधील 89 हजार रुपयांचे दागिने चोराने केले लंपास 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शहरात सध्या बालाजी महाराज यात्रा सुरू असून यात्रेत होणाऱ्या गर्दीचा फायदा चोर घेत असून यात्रेत आलेल्या एका महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने चोराने लंपास केल्याची घटना 23 ऑक्टोंबर रोजी रात्री 7 ते 9 च्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे की सौ अर्चना विठ्ठल राव अरसुळ रा पऱ्हाडा जिल्हा जालना ही महिला माहेरी ग्राम गिरोली खु येथे दिवाळी सना निमीत्य आल्या होत्या, देऊळगांवराजा येथे यात्रे मध्ये फिरत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पर्सची चैन उघडुन

त्यामधुन सोन्याचे धातुचे कानातील एक झुंबर वजन 3 ग्रॅम, किंमत अंदाजे 3000/- रु. सोन्याचे धातुचे मीनी गंठन 13 ग्रॅम, किमत

अंदाजे 20,000/- रु चे, . सोन्याची धातुचे लॅग पोत 3 तोळे किंमत 60,000/-रु असा एकुन 89,000/- रू चा ऐवज लंपास केला, चोरीची तक्रार महिलेने पोलिस ठाण्यात आज 24 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजता दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये