अवैध्यरित्या गांजा मालाची विक्री करीतांना एकास अटक
पोलीस ठाणे वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कामगीरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 14/10/2025 रोजी पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून एन.डि.पी.स. कायदयातील तरतुदीनुसार छापा घातला असता आरोपी नामे रूपेश घनश्याम उईके वय 24 वर्ष रा. बुरड मोहल्ला, वर्धा हा आपले ताब्यातील वाहन मोपेड दुचाकी गाडी सुझुकी एक्सेस 125 चे डिक्कीमध्ये गांजा अमलीपदार्थ बाळगुन असतांना मिळुन आल्याने पालीसांनी त्यास अटक केली. दिनांक 14.10.2025 रोजी रात्री 09.30 वा. चे सुमारास वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरून त्यांनी मा. पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पंच, मापारी, फॉरेसिंक पथक व पोलीस स्टॉफसह बजाज सायन्स कॉलेज समोरील रोडवर मोपेड दुचाकी गाडी सुझुकी एक्सेस 125 क्रमांक नसलेल्या वाहनाची तपासणी केली असता वाहनाचे डिक्कीमध्ये एका प्लास्टीक पन्नीमध्ये 1 किलो 34 ग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ मिळुन आल्याने एन.डि.पी.एस. कायदयाअन्वये कार्यवाही करून एकुण 130680 रू चा मुद्देमाल जप्त केला.
हि कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक संतोष टाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, राजेश राठोड, अभिजीत वाघमारे, सुरज जाधव, योगेश ब्राम्हण, राजेश दहाळ यांनी केली त्यामुळे शहर परीसरात अवैध्य अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींवर प्रतीबंध करण्यास पोलीसांना यश मिळाले.
सदर गुन्हयात अटक केलेल्या आरोपीवर यापुर्वी सुद्धा वेगवेगळ्या कलमाअन्वये गुन्हे नोंद असल्याबाबत माहीती मिळाली.