ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहतूक नियंत्रण शाखेकडून सावंगी आयुर्वेदिक कॉलेज मधील विद्यार्थी यांना वाहतूक नियमांची जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आ. सर. दि 15/10/25 रोजी मा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन यांच्या सुचणे नुसार वाहतूक नियंत्रण शाखे वर्धा तर्फे सावगी येथील श्री दत्ता मेघे आयुर्वेदिक कॉलेज येथील विद्यार्थी यांना वाहतूक नियमाचे पालन करणे याबाबत जनजागृती शिबिराचे आयोजन दुपारी 04/00 ते 05/00 वाजेपर्यंत करण्यात आले त्यामध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि सहाय्यक पोलीस उप निरीक्षक रियाज खान यांनी सर्व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले

Oplus_131072

थोड्याच दिवसापूर्वी वर्धा नागपूर रोडवर इव्हेनट हॉटेल समोर कॉलेज मधील विध्यार्थी याच्या गाडीचा अपघात होऊन तो मृत्यमुखी झाला होता त्यामुळे सर्व कॉलेज व मित्र परिवार मध्ये दुःखी वातावरण निर्माण झालेले होते पुन्हा असा अपघात होऊ नये कोणाचीही प्राणहानी होऊ नये शारीरिक अपंगत्व कोणास येऊ नये म्हणून मा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या सुचणे नुसार सर्व शाळा कॉलेज मधील विध्यार्थी यांना वाहतूक नियमाचे ज्ञान व्हावे त्यांनी वाहतूक नियमाचे पालन करावे याकरिता आज आयुर्वेदिक कॉलेज सावनगी येथे जनजागृती कार्यक्रम हा उत्साहात साजरा झाला ज्यामध्ये वाहतूक विभागाकडून वाहन चालवीताना हेल्मेट चा वापर करणे.

वाहन चालवीतना मोबाईल चा वापर करू नये, हेड फोन चा वापर करू नये, अपघातामधील जखमी यांना लवकर दवाखान्यात उपचार करिता दाखल करणे, अपघाताची माहिती त्वरित डायल 112 पोलिसांनची मदत करिता माहिती देणे. डायल 108 हा अंबुलेन्स मदतीकरिता टोल फ्री क्रमांक. सायबर फ्रॉड, सायबर क्राईम. पोस्को कायदा, महिला सुरक्षितते करिता असलेले कायदे, गुड टच बेड टच याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, विद्यार्थी यांनीही काही सूचना दिल्यात त्यावर ही कार्यवाही सुरु आहे

पो. नि. वाहतूक शाखा.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये