समर्थ कृषी महाविद्यालयात घेतली फटाके मुक्त हरित दीपावली प्रतिज्ञा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे फटाके मुक्त दीपावली प्रतिज्ञा घेण्यात आली.
वायु व ध्वनी प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या समस्या हे टाळण्यासाठी दिवाळी तथा इतर वेळी फटाके फोडणार नाही प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू शुद्ध ठेवण्यासाठी, पर्यावरण पूरक जीवनशैली व पवित्र राष्ट्रकार्यासाठी इतरांना प्रवृत्त करण्यासाठी शपथ घेण्यात आली. प्रदूषणामुळे जागतिक तापमान वाढ , जागतिक तापमान वाढ तसेच सर्व सजीवांच्या उज्ज्वल वर्तमान व भविष्यकाळासाठी प्रत्येकाने जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण टाळून सर्वांनीच पर्यावरण संवर्धनसाठी कार्य करणे गरजेचे आहे कार्य करणे गरजेचे आहे.
सर्व उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरे व्हावेत व वसुंधरेचे संवर्धन कसे होईल याचा सर्वांनी विचार केला पाहिजे त्या त्यानिमित्ताने सेवानिवृत्त वनाधिकारी जगन डोईफोडे, वनश्री जना बापू मेहेत्रे युनायटेड भारत फाउंडेशन ची दुर्गेश बनकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मेहेत्रे , रासेयो अधिकारी प्रा. योगेश चगदळे व इतर सर्व प्राध्यापक वृंद तसेच रासेयो स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रत्येकाने उपयुक्त देशी वृक्ष लावून व वसुंधरेचे संरक्षण करून दिवाळी साजरी करावी. असे आवाहन करण्यात आले.