ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री बालाजी महाराज अश्वीन उत्सवाची सांगता 

श्री बालाजी संस्थानला 19 लाख 86 हजार 385 रुपये देणगी प्राप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

प्रति तिरुपती बालाजी म्हणून ओळख असलेल्या ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या अश्विन उत्सवाची श्री बालाजी संस्थान येथे पंचा समक्ष काणगी मोजणी करून उत्सवाची सांगता झाली. यावर्षीच्या आश्विन उत्सवामध्ये भाविकातर्फे 19 लाख 86 हजार 385 रुपयाची काणगी प्राप्त झाली. ही काणगी मागील वर्षापेक्षा 38 हजार 919 रुपयांनी वाढ झाली आहे अन्नदानाच्या 11 हजार रुपयांच्या पावत्या 19 भक्तांनी फाडल्या तर 19 किलो चांदी वट्टमवार बंधू यांनी दान स्वरूपामध्ये श्री बालाजी चरणी अर्पण केली.

    श्री बालाजी महाराज यांच्या पारंपारिक अश्वीन उत्सवात नवरात्र घटस्थापनेपासून प्रारंभ झाला. या काळात दहा दिवस लाटा मंडप उत्सव झाला. दसऱ्याला श्री बालाजी महाराजांची पालखी मिरवणूक झाली.ही मिरवणूक तब्बल वीस तास चालली. यावेळेस हजारो भक्तांनी श्री बालाजीच्च्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेतले. चतुर्थीला लवीत उत्सव संपन्न झाला.महाराष्ट्रातील खाने कोपऱ्यातून हजारो भक्त या उत्सवामध्ये सहभागी झाली होते. या उत्सव काळातील श्री बालाजी महाराज मंदिरातील हंड्यामध्ये ‘श्री बालाजी संस्थान येथे देणगी स्वरूपात पावती फाडून व गुप्तदान पेटीत भक्तांनी देणगी स्वरूपात दान दिले . या सर्वांची मोजणी श्री संस्थान येथे पंचा समक्ष मोजणी करण्यात आली. ही संपूर्ण देणगी 19 लाख 86 हजार 385 प्राप्त झाली. मागील वर्षापेक्षा 38 हजार 929 रुपयांनी देणगीत वाढ झाली.

याशिवाय अन्नदानाच्या 11 हजार रुपयाच्या 19 भक्तांनी पावत्या फाडल्या. वट्टमवार बंधूंनी 19 किलो चांदीची देणगी श्री बालाजी चरणी अर्पण केली

      श्री बालाजी संस्थांनचे वंशपारंपरिक विश्वस्थ राजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनात तसेच श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी सि. राजा यांच्या मार्गदर्शनातमी श्री बालाजी संस्थांनचे व्यवस्थापक नंदकिशोर बिडकर यांच्या नियोजनामध्ये मानकरी सेवेकरी प्रशासन व श्री बालाजी भक्त यांच्या सहकार्याने शांतते संपन्न झाला .हार्दिक मोजण्यासाठी पंच मंडळ वसंतराव कुलकर्णी, श्रीपाद गोंदकर ‘भगवान पिंपळे ‘अनिल मल्लावत’ मिलिंद पापडे यांच्या समक्ष व प्रसिद्धी प्रमुख सुरज गुप्ता बालाजी भक्त वसंतराव मोगरकर, चंद्रकांत मोगरकर, सुधाकर पिंपळे ‘कल्पेश कुळकर्णी’कैलास धन्नावत, ब्रिजमोहन मल्लावत’ अप्रमेय हरदास ‘निलेश अग्रवाल’ बाळू सावजी ‘अमोल लताड,जयेश पापडे, गुड्डू सराफ, नमन अग्रवाल आदित्य सराफ’ मंगेश तिडके आशिष वैद्य व श्री बालाजी संस्थान कर्मचारी यांनी काणगीची मोजणी केली.

व्यवस्थापक बिडकर यांनी उत्सव काळा सहकार्य करणारे सर्व मानकरी सेवेकरी प्रशासनाचे विविध विभाग,पोलीस प्रशासन,पत्रकार, देणगीदार,समस्त बालाजी भक्त, पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये