महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयामध्ये दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल, डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे देशाचे महान वैज्ञानिक विचारक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.
देशाच्या राष्ट्रपतीपदाची ही जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. एका गरीब कुटुंबातून जन्माला आलेले अब्दुल कलाम निश्चितच युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान पाहून जन्म हा वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या जीवनकार्याची आठवण म्हणून महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचनातून ज्ञान संवर्धन होउन समज व आकलन क्षमता वाढते, भाषा कौशल्य व संभाषण कौशल्य विकसित होतात. विनोदला ताण तणाव कमी करायचा असेल तो रोज एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे त्यामुळे एकंदरीत व्यक्तिमत्व विकास होतो असा संदेश या कार्यक्रमांमध्ये दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामकृष्ण पटले, प्रा. कामडी मॅडम, श्री नरसिंह पांचाळ सर उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन संचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले.