ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाने अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात
12 हजार 501 रुपयाची मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय सिव्हिल काॅलनी देऊळगाव राजा व जनसेवा सामाजिक समिती च्या वतीने 12हजार 501 रुपयेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता मदत म्हणून तहसील कार्यालयात श्री कौशिक साहेब नायब तहसीलदार यांचे मार्फत पाठवले आहे.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री. श्री.बळिराम मापारी, सचिव गोविंदराव बोरकर, वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, पंडितराव पाथरकर, प्रा अशोक डोईफोडे, रमेश नरोडे, प्रकाश अहिरे , अरुण सपाटे,मधुकरराव धुळे, व इतर उपस्थित होते.