ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूरच्या राणी हिराई शासकीय औद्योगिक संस्थेला नवा विकासाचा वेग

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश ; मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार पाहणी

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर : बल्लारपूर येथील राणी हिराई शासकीय औद्योगिक संस्थेतील रिक्त पदे भरणे आणि नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मा. मंगलजी प्रभात लोढा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत आज मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार संबंधित विभागाची टीम बल्लारपूर येथे दाखल होऊन संस्थेची सविस्तर पाहणी केली.

कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मा. मंगलजी प्रभात लोढा यांची प्रत्यक्ष मुंबई भेट घेऊन आ.मुनगंटीवार यांनी निवेदन दिले होते. या संस्थेत निदेशक गणित चित्रकला – १, वरिष्ठ लिपिक- २, कनिष्ठ लिपीक – ३, चतुर्थ श्रेणी कर्मचारी – ३ याप्रमाणे एकूण ९ पदे रिक्त आहेत. तसेच शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र बल्लारपूर येथील निदेशक-२, वरिष्ठ लिपीक -१, लिपीक टंकलेखक- १, सहाय्यक भंडारपाल- १ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी २ याप्रमाणे एकूण ७ पदे रिक्त आहेत. आणि हिराई शासकीय औद्योगिक संस्था बल्लारपूर ९ पदे आणि शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र बल्लारपूर येथील ७ असे एकूण १६ रिक्त पदे भरण्यासाठी निवेदन दिले होते.

या पाहणीमुळे रिक्त पदे भरणे आणि नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या संस्थेला नवे अभ्यासक्रम तसेच आवश्यक मनुष्यबळ मिळणार आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

बल्लारपूरच्या औद्योगिक संस्थेला नवसंजीवनी मिळणे म्हणजे येथील युवकांसाठी तांत्रिक शिक्षणाची नवीन दारे खुली होणार आहेत. स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत रोजगाराची हमी मिळावी हा या मागणीचा उद्देश असून, शासनाने त्यावर त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा मला आनंद आहे,अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

स्थानिक विद्यार्थी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, उद्योगनगरी बल्लारपूरला तांत्रिक कौशल्य विकासाचे नवे केंद्र म्हणून बळकटी मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये