लाडक्या बहिणीच्या खात्यावरील पैसे उडविले कोलाम – भगिनीचा टाहो

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
राज्य शासनाच्यालाडक्या बहिणीची भेट बनवून रक्षाबंधनाच्या पूर्वी दिनांक ७ ऑगस्ट बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये रक्षाबंधनाची भेट म्हणून जमा झाले होते मात्र या जमा होणाऱ्या रकमेवर एका फसवणूक करणाऱ्या तरुण युवक मी धानोली या गावचा आहे मला शासनाने तुमचे आधार कार्ड करण्याचे काम मला दिले म्हणून त्या भागातील टांगारा खडकी चनई खैरगाव या गावात थम्स मशीन व लॅपटॉप घेऊन घरोघरी लाडक्या बहिणीच्या दिनांक आठला गावी पोहोचला व टांगारा येथील साध्या भोळ्या आदिवासी कोलाम समाजाच्या भगिनींना एकत्र करून तुमचे आधार कार्ड आणा बँकेचे पासबुक किंवा पोस्टाचे पासबुक घेऊन या मी तुमचे रकमा जमा झाले आहे इथेच तुम्हाला विचार करून देतो मात्र तुमचा आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे तुम्हाला पैसे काढण्याची अडचणी आहे असे म्हणून सर्व साध्या आदिवासी महिलांचे थंब घेतले व त्यानंतर तुमचे थंब यावर येत नसल्याने डबल तुम्हाला मी येऊन तुमचा आधार कार्ड अपडेट करून देतो असे म्हटले या गावातील रंजनाबाई आत्राम आयु भीमबाई सिडाम फुलाबाईकोडापे गिरजा सिडाम जंगुबाई कोडापे सोनाबाई कोडापे शांताबाई सिडाम यांच्या पोस्ट खात्यावरील सर्व पंधराशे रुपये प्रत्येकी याप्रमाणे यांच्या खात्यावरील रकमा त्यांनी आपल्या खात्यावर वर्ग केले व काही वेळानंतर यांना सायंकाळी मोबाईलवर मेसेज आल्याने आपली फसवणूक झाली आहे.
तेव्हा गावातील सर्व महिला खात्यावरचे पैसे गायब झाले म्हणून आरडा ओरडकरू लागले तो गावात येऊन मी आश्रम शाळेच्या जवळ राहतो माझ्याकडे लाडक्या बहिणीचे खाते खोलने आधार कार्ड अपडेट हे काम करत आहोत आपण सर्वांनी अंगठे दिले आहे हे पैसे तुम्हाला लवकरच खात्यावर मिळेल असे सांगून आमची फसवणूक केली त्यांनी गावात थम मशीन व लॅपटॉप घेऊन सायंकाळी सहाच्या दरम्यान गावात येऊन लोकांची फसवणूक केली घाई घाईने सर्वांचे ठाम घेऊन तो गावातून पसार झाला मात्र काही वेळेतच सर्वांना रकमा उचल झाल्याचा मेसेज झाल्याने फसवणूक झाल्याबद्दल त्यांनी शोधाशोध सुरू केला तो एका आश्रम शाळेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे व त्याचे नाव अक्षय राठोड असल्याचे महिलांना कडून आले.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सहसचिव आबिद अली यांची भेट घेऊन हकीकत सांगितले यावरून उपरोक्त फसवणुकीबद्दल पोलिसात तक्रार करण्यात आली व यापुढे आपले कोणतेही दस्ताऐवज आधार कार्ड किंवा बँकेचे पासबुक कोणत्याअनोळखी व्यक्तीलादेऊ नये आपल्याला अडचणी असल्यास थेट पोस्ट खात्यात किंवा तहसील कार्यालयात भेट घेऊन चौकशी करावी मात्र अशा भामटेगिरी करणाऱ्या व सामान्य लोकांना फसवणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली कागदपत्र देऊ नये असे आबिद अली यांनीआव्हान केले आहे.