साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दि.३ ऑगस्ट २०२५ ला चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व समाजप्रबोधनाचा कार्यक्रम समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्याचे मुख्य सल्लागार आयु. किशोर प्रल्हादराव नगराळे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक आयु. प्रशिक आनंद सर (आंबेडकरी विचारवंत ) होते. कार्यक्रमाला समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचे राज्याध्यक्ष आयु. रुपेश वालकोंडे, उपाध्यक्ष आयु. विनोद बच्चलवार, विजय देवतळे, सचिव आयु. किशोर नरुले, सहसचिव आयु. संदीप येनगंट्टीवार, कोषाध्यक्ष आयु. विनोद आसमपल्लीवार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आयु. विजय गंगासागर, आयुनी. सुनिताताई नगराळे, आयुनी. संध्याताई खैरे, आयु. लालाजी पोहरे,आयु. वामनराव आमटे व नवीन वाघदरा ता.वणी, जिल्हा. यवतमाळ येतील कमलाबाई चंदावार माई,
आयु.संजय लाटेलवार व वागधरा गावातील सामाजिक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या तसेच संगीता तावाडे मॅडम, प्रफुल बोबडे सर, आयु. रोहन गज्जेवार, हे सुद्धा उपस्थित होते.
अनेक वक्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व समाजिक परिवर्तनासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुनी. ज्योतीताई आसमपल्लीवार यांनी केले
व आभार प्रदर्शन विनोद जी आसमपल्लीवार यांनी केले. या वेळी अनेक अण्णाभाऊ साठे विचारवंत महिला, पुरुष व युवा पिढी उपस्तीत होते.