विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा व विदर्भ महाविद्यालयाचा करार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- करिअर कट्टा ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचं एक व्यासपीठ आहे जे तरुणांना करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी, स्वयंपूर्ण कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी यासाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ञ, अधिकारी, यशस्वी व्यक्ती संवाद साधून अनुभव सांगतात.
विदर्भ महाविद्यालय जिवती आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) नुकताच करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहेत. या करारानुसार, ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत नियमितपणे महाविद्यालयात IAS/MPSC/Banking इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिरे, करिअर गाईडन्स सेशन्स – विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या व्याख्यानासह ऑनलाईन व ऑफलाईन मोफत अभ्यास साहित्य उपलब्ध करणे, कौशल्य विकास कार्यशाळा – डिजिटल स्किल्स, संवाद कौशल्ये, उद्योजकता इ. या उपक्रमामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नवीन उर्जा, दिशा आणि स्पर्धात्मकतेचे वातावरण निर्माण होणार आहे. “विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच्या शोधात न राहता, स्वयंरोजगार, नवउद्योजकता आणि विविध संधी शोधण्यासाठी प्रेरित करण्याचे काम या उपक्रमातून घडणार आहे.”
या सामंजस्य कराराकरीता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे आणि विदर्भ महाविद्यालय जिवती च्या करिअर कट्टा समन्वयक डॉ. योगेश खेडेकर यांनी करारावर स्वाक्षऱ्या करुन भविष्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडविण्यास एकमेकांना सहकार्य करतील. या कराराकरिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या पुढाकार, प्रेरणा व मोलाचे सहकार्यामुळे आणि करियर कट्टा तालुका समन्वयक डॉ. गजानन राऊत, प्राचार्य डॉ. म्हाशाखेत्री यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आला. या करारा मुळे विद्यार्थी व महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले आहे.