ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड येथे बैल पोळा उत्सवावर पाण्याचे संकट.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

भारत कृषी प्रधान देश असून बरेच शेतकरी परंपरा गत शेती करताना बैल प्राण्याचा साधन म्हणून उपयोग करायचा मात्र आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाल्याने ट्रॅक्टर व इतर यंत्रणाच्या सह्ह्याने शेती करीत आहे. यामुळे शेतकरी बळीराजा आज आधुनिक काळात बैलाऐवजी ट्रॅक्टर चा वापर करीत आहे मनुष्य बळ आणि यंत्र यांच्या सह्ह्याने कमी वेळात जास्त काम होत आहे.

शेतकरी बळीराजा देशाचा पोशिंदा समजला जातो मात्र त्यावर अस्मानी -सुलतानी संकट येत असल्याने मिळाकुटीला आला असून उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी वस्तुस्थिती असल्याने शेतकरी बळीराजा नाईलाजास्तव शेती करीत आहे. त्याला संसाधन म्हणून बैल जोडी महत्वाची समजली जात होती पण आज बैल जोडी आणि तिची जोपासना करण्यासाठी लागणारे कष्ट यासाठी कोणीही तयार नाही यामुळे बैल हा शेतकऱ्याचा महादेव कमी होत असल्याचे दृश्य सर्वत्र दिसून येत आहे तरी आज बैल पोळा निमित्याने पावसाचे संकट असतानाही नागभीड येथे उत्सवात बैल जोड्याची संख्या जेमतेम असल्याचे दिसून येत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये