गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील महिला आरोपीस नाशिक येथून ताब्यात

गुन्ह्यातील एकूण ९७ हजार रु. चा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सदर प्रकरणाची हकीकत याप्रमाणे आहे की, नमुद घटना ता.दि. 13/03/2023 चे 13/15 वा. दरम्यान  यातील फिर्यादीची काकू हिने स्वतःचे काळजी घेण्याकरिता ठेवलेल्या दोन महिलेपैकी रेणू येडलेवार हिने दिनांक 13/03/23 रोजी फिर्यादीचे काकूला मारहाण करून तिचे अंगावरील 1) सोन्याच्या दोन बांगड्या, 2) सोन्याचा एक गोफ, 3) सोन्याची एक अंगठी, 3) नगदी 3000 /- रुपये, 4) सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल असा एकूण 1,96,000/- रु. चा मुद्देमाल जबरीने चोरी करून पळून गेली अशा तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासावर होता.

सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडून समांतर तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील महिला आरोपी रेणू अशोक येडलेवार, वय 28 वर्ष, रा. जैन मंदिर जवळ, रामनगर वर्धा ह. मु. पाथर्डी, ता.जि. नाशिक हिने मोहम्मद फयाज याचेसोबत लग्न केले असून ती त्याच्या सोबत नाशिक येथे राहत आहे व तिचे पतीचा रोड अपघात होऊन तो नाशिक येथील कोणत्यातरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने मा. वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टॉप व महिला कर्मचारीसह नाशिक येथे जाऊन नाशिक येथील नाशिक व लगतच्या हॉस्पिटल मधील माहिती घेतली असता सदर महिलेचा पती हा एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव ता.जि. नाशिक येथे भरती असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तेथे जाऊन माहिती प्रमाणे महिला आरोपी व तिचा पती मिळून आल्याने महिला आरोपी हिला विचारपूस केली असता तिने सांगितले की घटना वेळी ती एकटीच होती तिच्या सोबत कोणी नव्हते तिने जबरीने चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी सोन्याचा गोफ व सोन्याची अंगठी ही आईला वर्धा येथे दिल्याचे सांगितले तसेच एक बांगडी नाशिक येथे गहाण ठेवल्याचे व एक बांगडी अजमेर येथे सोनाराकडे विकल्याचे व मिळालेल्या पैशातून एक सोन्याची अंगठी बनविले व तीअंगठी कोसामट्टम फायनान्स मध्ये ठेवल्याचे तसेच उर्वरित पैसे स्वतः खर्च केले असे सांगितले वरून ज्या इसमाकडे बांगडी गहाण ठेवली त्याचे कडून जप्ती पत्रका अन्वये एक सोन्याची बांगडी जप्त केली तसेच फायनान्स मधून एक सोन्याची अंगठी हस्तगत केली असा जुमला किंमत 97,000/- रु.चा मुद्देमाल हस्तगत केले.

सदर महिलेचा पती हा एसएमबीटी हॉस्पिटल मध्ये भरती असून उपचार घेत असल्याने त्यास उपचारानंतर तपासी अधिकारी यांच्या समक्ष हजर राहण्याकरिता सूचनापत्र देण्यात आले महिला आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करिता पो स्टे रामनगर येथे गुन्ह्यांचे तपास अधिकारी याचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा श्री नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दरेकर, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, नरेंद्र पाराशर, संजय बोगा, विनोद कापसे, निलिमा कोहळे स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व अक्षय राऊत सायबर सेल वर्धा यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये