ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निर्माणी वसाहतीत 12 फूट अजगर आढळला

सर्पमित्रांनी केले निसर्ग मुक्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        एरवी वाघ, बिबट्यांचे नित्य दर्शन होत असलेल्या शहरातील आयुध निर्माणी वसाहतीत एका 12 फूट लांबीच्या अजगराने हजेरी लावली. या अजगराला सर्पमित्रांनी पकडून त्याला त्याच्या सुरक्षित अधिवासात मोकळे केले. आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर सहा मध्ये असलेल्या इंद्रप्रस्थ गार्डनच्या अगदी प्रवेशद्वारावरच हा अजगर आढळून आला.

याची माहिती सर्पमित्र अनुप येरणे व आशिष चहाकाटे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले सहकारी श्रीपाद भाकरे, बंटी मंडल व इम्रान खान यांचेसह घटनास्थळी जाऊन या अजगरास ताब्यात घेतले व त्याला जंगलातील सुरक्षित अधिवासात निसर्ग मुक्त केले. विशेष म्हणजे या गार्डनमध्ये लहान मुले नेहमी खेळत असतात.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये