ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक 

दोघे जखमी

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गारगुंडी फाट्यावर मोटारसायकललाअज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार व त्याच्या पाठीमागे बसलेला जबर जखमी झाल्याची घटना १ ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे की,गजानन काशीनाथ काकड हे त्यांचे मोटारसायकल क्रमांक MH-28 X-1826 सुपर स्प्लेंडरने गारगुंडीवरुन मेव्हणाराजा गावाकडे शेतात काम करण्यासाठी रोजदार आणण्या साठी चालले होते. गजानन काशीनाथ काकड व पाठीमागे बसलेले बद्रीनाथ मालोजी काकड हे मोटारसायकलने मेव्हणाराजा येथे जात असतांना गारगुंडी ते मेव्हणाराजा रोडवरील गारगुंडी फाट्याजवळ मेव्हणाराजा कडुन येणा-या अज्ञात वाहनाने त्यांचे मोटारसायकलला समोरुन जोरात धडक मारल्याने गजानन काकड यांचे डाव्या पायाला, डाव्या हाताला व उजव्या हाताला मार लागुन फॅक्चर केले आहे तसेच डोक्याला मार लागला आहे. पाठीमागे बसलेले बद्रीनाथ मालोजी काकड याचे नाकाला, तोंडाला, हाताला व पायाला मार लागुन जखमी झाले आहे.

दोघांना जालना येथे संतकृपा हास्पीटल जालना येथे उपचार चालु आहे. संदीप काकड यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये